देश

बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…

भोपाळ (मध्य प्रदेश): पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा रस्त्यावर साप दिसतात. एका गावात कोब्रा जातीचा साप एका व्यक्तीला चावला. विशेष म्हणजे ती व्यक्ती बचावली; पण साप मेला. एखाद्या विषारी सापाने माणसाला चावा घेतला तर तो माणूस मरू शकतो; पण माणसाला चावल्यावर साप मेला, असा उलटा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. या गावात नक्की काय घडलं होतं त्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील सागर येथे ही घटना घडली आहे. सागरच्या नरयावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर एक साप आला होता. स्थानिकांनी तो साप पाहिल्यानंतर सर्पमित्राला याबाबतची माहिती दिली. सर्पमित्र चंद्रकुमार घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने हा साप किंग कोब्रा असल्याची ओळख पटवली. चंद्रकुमार साप पकडत असताना त्याला साप चावला.

साप चावल्यानंतर चंद्रकुमारला उपचारांसाठी रुग्णालयात गेला. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. मात्र, गावात सापाचा मृत्यू झाला. युवकाला साप चावला व साप मेला, अशी अफवा सगळीकडे पसरली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आणि पोलिसांनी तपास केला असता घटनेमागचं खरं कारण समोर आले. साप कसा मेला, याचा शोध पोलिसांनी घटनेनंतर 14 दिवसांनी घेतला.

तपासात आढळलेल्या माहितीनुसार, साप पकडणाऱ्या चंद्रकुमारला हा साप चावल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले, तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले; मात्र इकडे गावातले लोक जमले आणि ते सापाला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. नंतर सापाला पकडून प्लास्टिकच्या डब्यामध्ये बंद करण्यात आले. गुदमरल्याने सापाचा मृत्यू झाला. यानंतर त्या माणसाला चावल्याने सापाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. अफवा पसरल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी साप पकडणाऱ्या चंद्रकुमारची चौकशी केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…

थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…

Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago