महाराष्ट्र

लोणीमध्ये नागपंचमीच्या दिवशी कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ९/८/२०२४ रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामना या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे केले आहे.

कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, पारनेर, हवेली, पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोते वर्ग उपस्थित राहतो. या भागातील कलगीतुऱ्याचा सर्वात मोठा महोत्सव असतो. साधारण दहा ते पंधरा हजार व श्रोत्यांचा समुदाय हजर असतो. सदर कार्यक्रमाला लोक उस्फूर्तपणे देणगी देतात. कोरोना काळातील दोन वर्षाचा खंड वगळता या कार्यक्रमला खंड पडला नाही. पौराणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी विषयावरती कलगीतुरा म्हणणारे गायक व त्याची साथीदार बहारदार कार्यक्रम करतात. लोणी मधील पंचरास मंडळी या कार्यक्रमाचे सुरुवात नांदीने करतात.

सदर कार्यक्रमासाठी सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, उद्योजक वसंत पडवळ, संतोष वाळुंज, तानाजी राजगुडे, धों. स. सुतार गुरुजी, जनकल्याण पतसंस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज, सहारा उद्योग समूह समूहाचे नामदेवराव वाळुंज, शिवाजी गेनभाऊ शिनलकर, बबनराव चौधरी, सदस्य रुक्मिणी वाळुंज आदी मान्यवर उपस्थित राहणारआहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलगीतुरा अभ्यासक लोणी गावचे माजी सरपंच उद्धवराव लंके करतात. सवाल जवाबा चे योग्य परीक्षण करून प्रश्न उत्तर बरोबर आहे की नाही हे श्रोत्यांना समजावून सांगतात. सदर कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावावी, असे आवाहन लोणी ग्रामस्थांनी व कलगीतुरा मंडळ यांनी केले आहे.

नागपंचमीनिमित्त रंगला कलगी-तुरा; सवाल-जवाबाने आली रंगत…

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

नागपंचमीच्या दिवशी लोणीमध्ये कलंगीतुऱ्याचा कार्यक्रमाचे आयोजन…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago