मनोरंजन

रितेश खूप ओव्हररिअ‍ॅक्ट झाले; बिग बॉस मराठी 6’नंतर सोनाली राऊतची स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई: सुपर मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत हिने ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शोमध्ये असताना घेतलेल्या एका निर्णयामुळे रंगलेल्या वादावर तिने आता थेट भूमिका मांडली असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांच्याबाबतही स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

टास्क नाकारल्यामुळे वादाची ठिणगी

‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना सोनालीने एक महत्त्वाचा टास्क खेळण्यास नकार दिला होता. नियमांनुसार तिला थेट नॉमिनेट करण्यात आले. त्यानंतर ‘भाऊच्या धक्क्यावर’ या विशेष भागात रितेश देशमुख यांनी तिच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

रितेश यांनी स्पष्ट शब्दांत सुनावत म्हटले होते,“हा अ‍ॅटिट्यूड तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही दाखवायचा. इथे सगळे सारखे आहेत. यावेळेला फक्त नॉमिनेट केलंय, पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन.”या वक्तव्यानंतर घरातील वातावरण चांगलेच तापले होते. अनेक स्पर्धकही या प्रसंगामुळे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

“मला अपेक्षेपेक्षा जास्त राग व्यक्त केला गेला”

शोमधून बाहेर आल्यानंतर ‘इंडिया फोरम’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने या प्रसंगावर सविस्तर भाष्य केले.

ती म्हणाली,“रितेश देशमुख खूप ‘ओव्हररिअ‍ॅक्ट’ झाले असं मला वाटतं. मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. मी त्यांना आधीपासून ओळखते आणि ते शो चांगल्या पद्धतीने होस्ट करत आहेत. पण त्या क्षणी मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाली.”सोनालीने सांगितले की, या घटनेचा तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला.“घराच्या आत नेमकं काय होतं, हे बाहेरून पूर्णपणे कळत नाही. ती गोष्ट मला मनाला खूप लागली आणि त्याचा परिणाम माझ्या गेमवर झाला,” असे ती म्हणाली.

होस्टवरही दबाव?

सोनालीने रितेश देशमुख यांची बाजूही समजून घेतल्याचे स्पष्ट केले. विविध भाषांमधील ‘बिग बॉस’च्या सीझन्समुळे होस्टची तुलना होत असते, विशेषतः मुंबईत असताना हिंदी आवृत्तीसोबत तुलना होणे टाळता येत नाही, असे तिचे मत आहे.

“हा त्यांचा दुसरा सीझन आहे. कदाचित त्यांच्यावरही दबाव असेल. प्रत्येक होस्ट स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्याच वीकेंडला ते खूप रागात होते आणि आम्ही सगळेच गोंधळलो होतो,” असे सोनालीने सांगितले.तिने हेही नमूद केले की, होस्ट स्वतः एपिसोड पाहून प्रतिक्रिया देतात की टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार बोलतात, याची तिला खात्री नाही.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

सोनालीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. काहींनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन केले, तर काहींनी होस्ट म्हणून रितेश देशमुख यांनी शिस्तीच्या दृष्टीने योग्य भूमिका घेतल्याचे मत व्यक्त केले.दरम्यान, या वक्तव्यावर रितेश देशमुख प्रतिक्रिया देणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी 6’मधील हा वाद पुढे आणखी कोणते वळण घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago