महाराष्ट्र

औट्रम घाटात होणार देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा

संभाजीनगर: प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर – कन्नड – चाळीसगाव या ९३ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या मार्गावर औट्रम घाटात तब्बल १७.५ कि.मी. लांबीचा स्वतंत्र रेल्वे बोगदा होणार आहे, जो देशातील सर्वात लांब ठरेल.

खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले की, आधी रेल्वे व रस्ते वाहतुकीसाठी एकत्रित बोगद्याचा विचार होता, पण आता वेगळे बोगदे होणार आहेत.

धाराशिव – बीड – संभाजीनगर – चाळीसगाव रेल्वे कॉरिडॉर

या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि दक्षिण भारताला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.  छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २.३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

संभाजीनगर – अंकाई (मनमाड) दुहेरीकरण वेगात

९८.२५ कि.मी. अंतराच्या दुहेरीकरणासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या अंकाई – करंजगावदरम्यानचे माती काम ४५% पूर्ण झाले असून पुलांचे काम झाल्यानंतर रेल्वे ट्रॅक टाकण्यात येईल.  २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.

छ. संभाजीनगर – परभणी दुहेरीकरण

या १७७.२९ कि.मी. अंतरासाठी २,१७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल.

वेरुळ – घृष्णेश्वराला रेल्वे कनेक्टिव्हिटी

या नव्या मार्गामुळे वेरुळ- ज्योतीलिंग घृष्णेश्वर देखील रेल्वे नकाशावर येणार आहे, ज्यामुळे पर्यटनाला मोठा बूस्ट मिळेल.

संभाजीनगर – अहिल्यानगर रेल्वेमार्ग

प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ कि. मी. अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे.

हा रेल्वेमार्ग ‘सिंगल’ नव्हे, तर ‘डबल २ लाइन’चा करण्यात येणार आहे.

हा मार्ग विद्युतीकरणासह दुहेरी 3 लाइनचा होईल. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago