rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

क्राईम महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक जिल्ह्यातील वावी पोलिस स्टेशन येथे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अशोककुमार एकनाथ खरात (वय 67, रा. मिरगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी वावी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, दिनेश मनाजी परब (रा. मुंबई) याने व्हाट्स अँप कॉल चॅटिंग आणि व्हाईस कॉलद्वारे बोलणे झाले. त्या दरम्यान त्याने खरात यांना सांगितले की, राजेंद्र अशोक जासूद याने तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो माझ्या मोबाईलवर पाठवले आहेत. त्यानंतर दिनेश परब याने ते आक्षेपार्ह फोटो अशोक खरात यांना व्हाट्स अँप वर पाठवले.

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

त्यानंतर खरात यांनी परब याला व्हाट्स अँप व्हाईस कॉल केला. त्यावेळी परब म्हणाला, जासूद यांच्याकडे अजुनही वेगवेगळ्या महिलांसोबत तुमचे आक्षेपार्ह फोटो आहेत. ते जर सोशल मिडियावर व्हायरल झाले तर तुमची समाजात खुप बदनामी होईल. त्यासाठी आपल्याला जासूद यांच्याशी बोलून विषय मिटवून घ्यावा लागेल असे सांगितले. त्यानंतर खरात यांनी परब याला बदनामी टाळण्यासाठी काय करावे लागेल असे विचारले असता 5 कोटी रुपयात तुमचा विषय आपण मिटवून टाकू असे त्याने सांगितले.

अशोक खरात यांनी मी माझ्या मुलीच्या लग्नामुळे व्यस्त आहे मी एकही रुपया देणार नाही असे परब याला सांगितले. 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी दिनेश परब याने अशोक खरात यांच्या व्हाट्स अँपवर काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो अशोक खरात यांच्या मोबाईलवर टाकत ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फोटो व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अशोक खरात यांनी दिनेश मनाजी परब (रा. भायखळा, मुंबई) आणि राजेंद्र अशोक जासूद (रा. पुणे) या दोघांच्या विरोधात वावी पोलिस स्टेशन, नाशिक येथे फिर्याद दाखल केली आहे.

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर