मुख्य बातम्या

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असुन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यातच शिरुर मतदार संघातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असुन सन २००९ पासुन वळसे पाटील या भागातले आमदार असुनही गेल्या १५ वर्षात यावर काहीच तोडगा न निघाल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहेत.

सन २००९ मध्ये शिरुर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव तालुक्याला जोडली गेली. त्यानंतर सलग १५ वर्षे शिरुर तालुक्यातील ३९ गावच्या सर्वसामान्य मतदारांनी दिलीप वळसे पाटील यांना सलग तीन वेळा विधानसभेत पाठवलं. परंतु पाबळ, केंदुर, कान्हूर मेसाई सह १२ गावचा पाणीप्रश्न मात्र ‘जैसे थे’ च राहिला. त्यामुळे या १२ गावच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असुन त्या नाराजीचा फटका या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना बसण्याची शक्यता असल्याची सध्या ४२ गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

याबाबत पाबळ येथील अनेक शेतकऱ्यांशी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधिने संपर्क साधला असता. गेली १५ वर्षे दिलीप वळसे पाटील यांना ४२ गावातुन आम्ही विधानसभेवर पाठवले तसेच वळसे पाटील हे गेली २८ वर्षे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री झाले आहेत. परंतु आमच्या १२ गावच्या पाण्याचा प्रश्न अजुनही जसाच्या तसाच आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व १२ गावचे शेतकरी वेगळी भुमिका घेणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

Loading ...

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

13 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

13 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

13 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago