मुख्य बातम्या

शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील जांबुत व पिंपरखेड परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. गेल्या पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्पशुटर टीम पिंपरखेड येथे दाखल झाली असून, डॉ. चंद्रकांत मंडलिक, झुबीन तैहमुर पोस्टवाला आणि विनोद सोनावळे या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील पथकाने ट्रॅप कॅमेरे, ड्रोन, शस्त्रास्त्रे व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानासह मोर्चा उघडला आहे. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, “पिंपरखेड येथे ८ व जांबुत येथे १४ पिंजरे बसविण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास अजून पिंजरे वाढवले जातील.”

मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार, बिबट्या दिसताच गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, पकडलेल्या बिबट्यांना जवळच्या जंगलात सोडले जात असल्याने ते पुन्हा गावात परतत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. माणिकडोह बिबट निवारण केंद्रात जागा संपल्यामुळे पकडलेल्या बिबट्यांचे पुनर्वसन अडचणीत आले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. परिणामी, जि.प. पिंपरखेड, कोयमहालेवस्ती, ढोमेमळा, दाभाडेमळा, गाजरेझाप, चांडोह (दुपारनंतर), माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, जांबुत, चांडोह व वडनेर खुर्द अशा नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत.

शिक्षण विस्तार अधिकारी के. बी. खोडदे यांनी सांगितले की, ‘बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी विद्यार्थी शाळेत न पाठवल्यामुळे शिक्षक हजर असूनही शाळा बंद राहिल्या.” दरम्यान, परिसरात घडणाऱ्या वारंवार हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांचा राग अखेर भडकला. मौजे पिंपरखेड येथे बिबट शीघ्र कृती दलाच्या बोलेरो वाहनाची (MH 14 KQ 3752) तोडफोड करून ती जाळण्यात आली. त्यानंतर दलाच्या इमारतीवर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. बेस कॅम्पमधील संरक्षण कुटीचे दरवाजे-खिडक्या, टेबल, खुर्च्या, पाण्याचे टँक, टॉर्च, सोलर लाईट्स यासह सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. माहिती फलकही फोडण्यात आला. या घटनेची माहिती वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे कार्यालयाने दिली आहे.

वीस दिवसांत तीन आणि शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांतील बारा बिबट हल्ल्यांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वनविभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी जनतेतील भीती आणि संताप शमण्याचे नाव घेत नाही. गावांमधील लोकांचा आक्रोश, शाळा बंद, तसेच मालमत्तेचे नुकसान पाहता, आता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे अपरिहार्य आहे,अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. बिबट्यांच्या वाढत्या हालचाली, ताणलेली सुरक्षा परिस्थिती आणि ग्रामस्थांचा असलेला रोष लक्षात घेता, मानव-वन्यजीव संघर्ष आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. यावर कठोर, योजनाबद्ध आणि शाश्वत उपाययोजना करण्याची गरज सर्व स्तरावरून व्यक्त होत आहे.

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

Video; कुत्राही मैत्रीला जागला…बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago