शिरूर तालुका

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (आंबेवाडी) येथे रविवारी (ता. २) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तातडीची उपाययोजना म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन घराजवळील मोकळ्या शेतात खेळत असताना हत्तीगवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले. काही वेळातच मुलगा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. तरुणांनी आरडाओरड करत ऊसाच्या शेतात शोध घेतला असता, रोहन मृतावस्थेत आढळून आला. या हृदयद्रावक घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने वनविभागाच्या गाडीची तोडफोड करून ती पेटवून दिली. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, तातडीची उपाययोजना म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानुसार शार्प शूटरची विशेष टीम घटनास्थळी रवाना झाली असून ती सकाळी 9 वाजता घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई करणार आहे. सध्या परिसरात २५ पिंजरे, १० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार असून ड्रोनच्या साहाय्याने परिसराची टेहळणी सुरू होणार आहे. जनजागृतीचे कार्यक्रमही वनविभागाद्वारे राबविण्यात येणार आहेत.

सदर मोहिमेचे मार्गदर्शन वनसंरक्षक आशिष ठाकरे आणि जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व त्यांच्या टीमकडून केले जाणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पिंपरखेड व जांबुत परिसरात बिबट्याची दहशत माजली आहे. अवघ्या वीस दिवसांपूर्वी पिंपरखेड येथीलच साडेपाच वर्षीय शिवन्या शैलेश बोंबे हिचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या असताना आणखी एका चिमुकल्याचा बळी गेल्याने गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, मागील दोन घटनांनंतरही वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, आज पुन्हा एका निष्पाप मुलाचा जीव गेला असून ग्रामस्थांनी वनविभागाकडून तातडीने निर्णायक कारवाईची मागणी केली आहे.

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

Video; कुत्राही मैत्रीला जागला…बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago