शिरूर (अरूणकुमार मोटे) : महाविद्यालयीन युवतीला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत विनयभंग करुन युवतीच्या होणाऱ्या पतीला फोन करुन उलटसुलट सांगितल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर पोलिस स्टेशन येथे सचिन कैलास गावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील युवती गावातून महाविद्यालयात जात असताना सचिन गावडे वारंवार तिचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडवून त्याच्याशी लग्न करण्याची मागणी करत होता. युवतीला अडवल्यानंतर सचिन याने युवतीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. ‘तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी तुला जगू देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यांनतर नुकताच युवतीचा साखरपुडा झालेला असताना सचिन याने युवतीच्या होणाऱ्या पतीचा मोबाईल नंबर मिळवत त्याला फोन करत युवतीबाबत उलटसुलट बोलून दमदाटी केली.
युवतीने याबाबत शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी सचिन कैलास गावडे (वय २० वर्षे रा. तामखर वाडी टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अरुण उबाळे हे करत आहेत.
शिरूर तालुक्यात युवतीला रात्रीच्या वेळी शेतात नेऊन केला अत्याचार…
शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…
शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…
धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…