शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. आनंदा सावळेराम ठोंबरे असे जखमी वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी आनंदा यांचा मुलगा बाबा ठोंबरे याने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे व त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे रविवारी (ता. १७) रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले. आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलांबई या गंभीर जखमी झाल्या होत्या. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ठोंबरे यांच्या आरडा ओरडामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. यामुळे दरोडेखोर पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटणास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून, सीसीटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड
दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक
शिरुर तालुक्यात दरोडा टाकुन रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्याची चोरी
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…