मुख्य बातम्या

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

शिरूर (तेजस फडके): राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाची चर्चा आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दिनेश परब याने 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी अशोक खरात याच्या व्हाट्स अँपवर काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो पाठवत ते फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फोटो व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अशोक खरात याने दिनेश मनाजी परब (रा. भायखळा, मुंबई) आणि राजेंद्र अशोक जासूद (रा. पुणे) या दोघांच्या विरोधात वावी पोलिस स्टेशन, नाशिक येथे फिर्याद दाखल केली होती.

त्यानंतर आरोपी राजेंद्र जासूद यांनी याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी नाशिक न्यायालयात धाव घेत अर्ज केला. त्यावेळी अर्जदार जासूद यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले कि, सन 2018 पासून अर्जदार व फिर्यादी हे चांगले मित्र आहेत. दोघांमध्ये अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत. अर्जदाराने फिर्यादीसाठी वैद्यकीय उपचार, परदेश प्रवास, मर्सिडीज कार इत्यादीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तसेच फिर्यादीच्या गरजेसाठी एका व्यक्तीच्या खात्यामार्फत काही कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. फिर्यादी अर्जदाराच्या क्रेडिट कार्डद्वारे खर्च करत होता. त्यामुळे भोंदू बाबा अशोक खरात यांची चांगलीच जवळीक असल्याचे सिद्ध होत आहे.

बातमी नंतर आमदार समर्थकांची ‘घालमेल’…
‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने राजेंद्र जासूद यांनी भोंदू बाबा अशोक खरात याला आलिशान महागडी कार भेट दिल्याची तसेच दोन आमदारांनाही महागड्या गाड्या भेट दिल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर एका आमदाराच्या समर्थकाने आकांडतांडव करत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच कायदेशीर कारवाई करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली. परंतु ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ मात्र कोणाच्याही दबावला बळी पडणार नाही. तसेच यापुढेही असेच निर्भीड आणि सडेतोड वृतांकन करत राहणार आहे.
(क्रमश:)

सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

6 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

6 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

7 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

7 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

7 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

7 तास ago