kauls

महिला सरपंचाच्या नवऱ्याने विकली चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कौल…

महाराष्ट्र

बुलडाणा: एका महिला सरपंचाच्या नवऱ्याने चक्क शाळेवरील चक्क कौलच विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवाना (जि. बुलडाणा ) गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील मंगलोरी कौल चक्क महिला सरपंचाच्या नवऱ्याने विकून टाकली आहेत, अशी तक्रार उपसरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायतची कुठल्याच यंत्रणेची परवानगी न घेता आपल्या पत्नीच्या पदाचा दुरुपयोग करून सरपंच पतीने जिल्हा परिषद शाळेवरील मंगलोरी कौल विकून टाकले आहेत. सदर घटनेची ग्रामसेवकाने देखील कुठलीच सूचना दिली नाही. त्यामुळे याप्रकरणी संबंधित सरपंच पतीवर आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महिला सरपंचाच्या नवऱ्याने शाळेची कौल विकल्याची माहिती नागरिकांना समजल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

विहिरीत आढळला विद्यमान सरपंच महिलेचा मृतदेह…

राजकारण! पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचाचे केले अपहरण; कारण…

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…