मुख्य बातम्या

अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…

विरोधकांकडून उठवल्या जातात वावड्या..
शिरूर (तेजस फडके): पुणे-सोलापूर महामार्गावरील गावांमध्ये आमदार अशोक पवार यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशोक पवार यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. आमदार अशोक पवार यांचे बॅनर हटवून त्याठिकाणी शरद पवार यांचे बॅनर लावल्यामुळे पूर्व-हवेली परिसरात विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके हे उभे आहेत. अशोक पवार दोन टर्म आमदार असल्याने व त्यांची अभ्यासू आमदार अशी ओळख आहे. शिवाय, अशोक पवार यांची कार्यसम्राट अशी ओळख आहे. अशोक पवार यांच्या कामामुळे त्यांना मतदार संघामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अशोक पवार यांचे गावोगावी मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सही प्रतिक्रियांच्या माध्यमातून अशोक पवार यांना पाठिंबा दर्शवित आहेत. अशोक पवार यांना सर्वच पातळ्यांवर मिळत असलेला मोठा प्रतिसाद मिळत आहे , गुरुवारी देशाचे नेते शरद पवार यांची वडगाव रासाई येथे जाहीर सभा होणार आहे याच अनुषंगाने मतदारसंघात अशोक पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून अशोक पवार यांची लावलेले बॅनर काढून त्या जागी शरद पवार यांची बॅनर लावले जात आहे, मात्र या गोष्टीचा विरोधक भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. शिरूर-हवेलीचा कल राजकीय जाणकारांच्या मते निर्णायक वळणावर झुकलेला असताना मोठी रंगत निर्माण झाली आहे. अनुभूवी, अभ्यासू व कसलेल्या पैलवानाप्रमाणे कार्यरत असलेल्या अशोक पवार यांनी राजकीय डावपेच साधत नवीन खेळी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मतदारसंघात अशोक पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेच्या निमित्ताने निष्ठा व शरद पवार यांचा फोटो असलेले फ्लेक्स मतदारसंघात लावल्यामुळे विरोधकांनी या बॅनरची धास्ती घेतली असल्याचे बोलले जात आहे.

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

1 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

4 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

4 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

5 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

5 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

5 तास ago