मुख्य बातम्या

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

शिरुर (तेजस फडके): सध्या थंडीच वातावरण सुरु असुन शिरुर-हवेली मतदार संघात मात्र विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम झाले असुन आमदार अशोक पवार यांनी दोन वेळा विधानसभेत निवडुन गेल्यानंतर केलेली विकासकामे विरुद्ध विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली ‘मलिदा गॅंग’ अशीच सध्या लढत सुरु झाली आहे.

अशोक पवारांचे विकासाचे राजकारण हे वीज, पाणी, शेती, आरोग्य या शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजांभोवती सतत फिरत रहाते. त्यामुळेच तालुक्यातील सुज्ञ जनता, सुशिक्षित तरुण वर्ग आणि अनेक उन्हाळे पाहीलेली जेष्ठ मंडळी पवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. मात्र तालुक्याच्या याच विकासाला गालबोट लावण्यासाठी सध्या तालुक्यात ‘मलिदा गॅंग’ नव्याने तयार झाली आहे. ज्यांना आपल्या जिल्हा परिषद गटाचा पाच वर्षांत कसलाही विकास करता आला नाही, त्यांना या ‘मलिदा गॅंगने’ स्वतः च्या फायद्यासाठी उमेदवार म्हणुन ,नेता म्हणुन खांद्यावर घेतले आहे. त्यासाठी बेरोजगार तरुणांची माथी भडकावुन, त्यांना या प्रचारात अग्रभागी आणुन प्रसंगी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही मलिदा गॅंग या निवडणुकीत आपला मुख्य कार्यभाग साधत आहेत.

कोणतीही निवडणुक म्हटलं की वैचारिक विरोध हा आलाच. मात्र या निवडणुकीत ही ‘मलिदा गॅंग’ वैचारिक विरोध करण्याऐवजी तालुक्याचा जोरात चाललेल्या विकासगाड्याला खीळ कशी घालता येईल, यासाठीच कटकारस्थाने रचत आहेत. शिरुर-हवेलीची निवडणुक जाहीर झाली आणि त्याच क्षणी बऱ्याच दिवसांपासुन दबा धरुन बसलेली मलिदा गॅंग जागृत झाली. मुळात ही मलिदा गॅंग नेमकी कोण आहे…? ती का तयार झाली…? आणि या गॅंगचे नक्की काय उद्दीष्ट आहे हे अजुनही सर्वसामान्य लोकांना कळलेले नाही.

मुळातच हि ‘मलिदा गॅंग’ म्हणजे एकेकाळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या भोवती चोवीस तास कार्यरत असणारे कार्यकर्तेच होते. ज्यातील काहींना पक्षाने पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष बनवले. काहींना औद्योगिक वसाहती मध्ये व्यवसायांसाठी स्थिरस्थावर केले, काहींना मोठ्या मनाने ठेकेदारीची कामे दिली. यातुन ही सगळी मंडळी आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मजबुत झाली. कारण पक्ष, पक्षातील राजकीय नेत्यांचा एक प्रकारे शरद पवार साहेबांचाच अंतिम वरदहस्त या मंडळींच्या डोक्यावर सातत्याने आशिर्वाद होता. पक्षात या मंडळींना चांगलाच मानमरातब होता. म्हणूनच शरद पवार साहेब यांच्यासाठी दैवतच होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक नियतीचा फेरा आला आणि अजित पवारांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला.

आता अशा वेळी शरद पवार साहेबांच्या पाठीशी ही मंडळी प्रामाणिकपणे उभी राहतील अशी खात्री होती. मात्र सरड्याने रंग बदलावे तसे या मंडळीनी रंग बदलले आणि भविष्यातील स्वतः चे राजकीय आणि व्यावसायिक अस्तित्व टिकवण्यासाठी या मंडळींनी एक गॅंग स्थापन केली. हि गॅंग म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांच्या विचारांना विरोध करणारी गॅंग.

हि ‘मलिदा गॅंग’ तशी हुशारच. विधानसभा निवडणुकी नंतर औद्योगिक वसाहतीमधील आपल्या व्यावसायांमध्ये इतरांचा कसलाही हस्तक्षेप होणार नाही. या कामांत कोणाचीही अडचण उभी राहणार नाही. कोणते काम कोणी करायचे, कोणाला कोणते काम द्यायचे, नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाना अशा पुढील निवडणुकीत आपापले राजकीय पुनर्वसन कसे करायचे या सगळ्यांची व्यवस्था लावुनच ही ‘मलिदा गॅंग’ या निवडणुकीत सक्रिय झाली आहे.

केवळ स्वतः च्या व्यवसायिक आणि आर्थिक फायद्यासाठी तयार झालेली हि ‘मलिदा गॅंग’ तरुणांचा नेमका काय फायदा करुन देणार हा अनेकांना पडलेला यक्षप्रश्नच आहे. म्हणुनच तरुणांनी अशा मलिदा गॅंगच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा किंवा बळीचा बकरा बनण्यापेक्षा स्वतः च्या आयुष्याचा आणि भविष्याचा विचार करुनच निवडणुकीत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
(क्रमशः)

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

6 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

23 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 दिवस ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago