मुख्य बातम्या

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): शरद पवार साहेबांच्या विचारांशी गद्दारी करुन शिरूर तालुक्यातील अनेक महाठग विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. एक प्रकारे निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक असून पवार साहेबांशी गद्दारी केलेल्यांना मतदार कधीही स्विकारणार नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे शिरूर-हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांनी केले.

करडे (ता. शिरूर) येथे विधानसभा प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी सरपंच सुनील इसवे, दत्तात्रय देशमुख, विजय कुमार जगदाळे,‌ अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अशोक पवार म्हणाले, ‘निष्ठावंत माणसांना समाज हा नेहमीच आपल्या ह्रदयात, मनात स्थान देतो, तर गद्दारी करणार्यांना समाज समाजातुन हद्दपार करत असतो हा इतिहास आहे. सध्या पैशाच्या जोरावर तरुणांची माथी भडकवणे, हेच या गद्दारांचे प्रमुख काम बनले आहे. मात्र सुशिक्षित तरुणांनी अशा गद्दारांच्या अमिषाला बळी पडु नये.’

चासकमानचे पाणी करडेत आणणार…
औद्योगिक वसाहती मुळे ‌करडे गाव आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले आहे, मात्र येथील शेती व शेतकरी अद्यापही हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. सध्या चासकमानच्या अस्तरीकरणासाठी निधी मंजूर आहे, यामुळे एक आवर्तन वाढीव मिळणार आहे. त्यामुळे करडे येथे सर्व्हेक्षण करुन चासकमानचे पाणी काही भागात आणता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील शेती बारामाही बागायती करता येणार आहे.

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

12 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago