शिरूरः शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत सह अनेक ग्रामपंचायतींनी बंद पाळण्यात आला. यावेळी शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे आणि राज्य संघटक सचिन जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्याच्या वतीने अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रभारी जिल्हा समन्व्यक तथा निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रभारी शिरूर तालुका अध्यक्ष सरपंच रमेश गडदे, निमगाव म्हाळुंगी चे माजी सरपंच राजेंद्र विधाटे, गणेश शिर्के, आदींनी शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब मस्के आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मस्साजोग (जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी एक दिवस राज्यभरातील ग्रामपंचायत बंद करण्याचे आंदोलन केले यात राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. राज्यातील सुमारे 15000 ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले.
सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आवाहना नुसार राज्यातील अनेक ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे व आपल्या मागण्याला वाचा फोडलेली आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीने बंद मध्ये सहभाग घेतला भोसरे व चोभेपिंपरी ग्रामपंचायत मध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत बंद केली व उपस्थितांना सांगताना म्हणाले की, ‘राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत. समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत. तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा.’
यावेळी अध्यक्ष जयंत पाटील यांनी शासना कडे विविध मागण्या केल्या यात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कायदा असावा, ग्रामसभेला काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, यामुळे प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांचे गावमध्ये स्मारक उभा करण्यात यावे सरपंचाला भविष्यात सुरक्षितता लाभण्या साठी त्यांना पेन्शन योजना तसेच त्यांना विमा संरक्षण शासना तर्फे देण्यात यावे. ग्रामसभा ही सर्व ग्रामस्थांसाठी खुली असते त्यावेळेस सर्व ग्रामस्थ तेथे सहभाग घेतात यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये गावातील लोकांना कायद्याने प्रवेश बंद असावा. यावेळी भोसरे व चोभेपिंपरी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा; अंबादास दानवे
निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…
रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण
शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला