शिरुर पोलीसांनी पेट्रोल पंपावर चोरी करणाऱ्या कामगारांना गुजरात मध्ये केले अटक 

क्राईम मुख्य बातम्या

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील एच. पी. पेट्रोल पंपावर कामगार म्हणून ठेवण्यात आलेल्या कामगारांनी तब्बल ९४ हजार ५२० रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला होता. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करत होते.

या गुन्हयातील आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा.देवरी, जि.रामसेन राज्य मध्यप्रदेश हा साखोडा ता.मोरबी जि. राजकोट (गुजरात) येथे कामाला असल्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना खबरीमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर केंजळे यांनी तात्काळ पोलीस हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप पोलीस अंमलदार अजय पाटील यांचे पथक तयार करुन आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड यास ताब्यात घेणेबाबत आदेश केला.

त्यानंतर तपास पथकाने साखोडा (गुजरात) ता.मोरबी जि.राजकोट येथे जावुन तांत्रीक विश्लेषन करुन गुजरात पोलीसांच्या मदतीने आरोपीत रामेश्वर गोड यास ताब्यात घेवुन गुन्हयाच्या कामी अटक करण्यात आली. शिरुर न्यायालयाने दि १८/०८/२०२५ रोजी न्यायालयीन कोठडी रिमांड मंजुर केली आहे. तसेच सदर गुन्हयातील विधीसंघर्षित बालकास देखील बाल न्यायमंडळ येरवडा पुणे येथे हजर करण्यात आले आहे.

शिरूर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी रामेश्वर गोंड हा गुजरात राज्यातील मोरबी तालुक्यातील साखोडा येथे काम करत असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून गुजरात पोलिसांच्या मदतीने आरोपीला साखोडा, मोरबी येथून ताब्यात घेतले. त्याला (दि १८) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस येरवडा येथील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप, अंमलदार विजय शिंदे व अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे.