आरोग्य

घरातली नकारात्मकता कमी करणाऱ्या ३ गोष्टी, घरात पॉझिटीव्ह वाटण्यासाठी आठवड्यातून एकदा ‘हे’ कराच

रोजच्यारोज आपल्याकडूनच काही चूका होतात आणि त्यामुळे मग घरात खूप निगेटीव्ह वाटायला लागतं त्यामुळेच जर आपण आपल्या वागण्यात काही बदल केले तर आपोआपच निगेटीव्ह वाटणारं घर सकारात्मक उर्जा देणारं होऊन जाईल.

आठवड्यातून एकदा तुमच्या घरातले निरुपयोगी सामान घराबाहेर काढा. बंद पडलेली घड्याळं, अन्य वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. घरातला पसारा कमी करा. जेवढा पसारा कमी कराल तेवढं घर अधिक प्रशस्त, छान वाटेल.

ही गोष्ट अगदी योग्यच आहे. कारण घरात जर खूप पसारा असेल, घर आवरलेलं, स्वच्छ, टापटीप नसेल तर आपोआपच घरात खूप अस्वस्थ होतं. पसारा पाहून चिडचिड होते, वैताग येतो. तेच जर तुम्ही स्वच्छ आवरलेल्या घरात बसला तर तुम्हाला छान प्रसन्न वाटतं. तिथे जास्त वेळ बसाव असं वाटतं.

दुसरा उपाय म्हणजे घरात कायम सुगंध दरवळत असावा. यासाठी तुम्ही धूप, उदबत्ती, कापूर अशा गोष्टींचा वापर करू शकता किंवा रूम फ्रेशनर वापरू शकता. यामागचं साधं- सोपं लॉजिक असं की दुर्गंधी असणाऱ्या ठिकाणी आपण बसू शकत नाही. जिथे छान सुगंधी वातावरण असेल तिथे आपोआप मन रमतं. प्रसन्न वाटतं.

तिसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यात रॉक सॉल्ट घालून त्याने फरशी पुसा. यामागचं विज्ञान असं की मीठ हे किटकनाशक आहे. मिठामुळे अनेक जंतू दूर होतात. त्यामुळे घर स्वच्छ होण्यासाठी, घरातले सुक्ष्म जंतू घालवून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा रॉक सॉल्टचा उपयोग करावा.. स्वच्छ, चकाचक घर असेल तर ते कोणालाही आवडतंच.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago