आरोग्य

डाळिंब आयुर्वेदिक उपयोग

डाळिंबाला संस्कृतमध्ये “दाडिम’ म्हणतात.डाळिंबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते. खाण्याकरिता कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे. यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.

1) चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे शमन करते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते व जाठराग्नीला प्रदीप्त करते.

2) गोड डाळिंबाचा रस उत्तम पित्तशामक असतो, विशेषतः घशा-पोटात जळजळ होत असताना, लघवीस आग होत असताना, मळमळत असताना खडीसाखर मिसळलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो.

3) डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण रहाते. पचनशक्ती, कर्करोगावर उत्तम उपाय. शरीरातील उष्णता कमी करण्यास पण मदत होते.

4) डाळिंबाच्या सालीचे चूर्ण मधात मिसळून चाटल्यास घशातला कफदोष कमी होतो.

5) अनेक दिवसांचा कोरडा खोकला व दम लागत असेल, तर डाळिंबाचा रस व मधाचे चाटण दिवसभर वारंवार द्यावे.

6) कधी घट्ट व कधी पातळ मलप्रवृत्ती होत असता दाडिमाष्टक उपयुक्‍त असते.

7) गर्भारपणात सुरुवातीचे तीन-चार महिने पित्ताचा त्रास होतो, अशा वेळी गोड डाळिंबाचा रस थोडा थोडा घ्यावा. याने पित्त तर शमतेच पण ताकदही नीट राहते

8) वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.

9) डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात.

10) डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

11) हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी गोड डाळिंबाचा रस उत्तम असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

15 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago