आरोग्य

जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध

घाम येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाम येत असेल तर त्याचा फार कुणी विचार करत नाही किंवा त्याकडे गंभीरतेनं बघत नाहीत. मात्र, अनेकदा गरमी नसताना किंवा एखादं मेहनतीचं काम न केल्यावरही घाम येत असेल तर चिंतेची बाब असू शकते. तसेच घामाची दुर्गंधीही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असते.

घामामध्ये खूपसारे बायो मार्कर्स असतात जसे की, ग्लूकोस, लॅक्टिक, अॅसिड, इलेक्ट्रोलाइट इत्यादी. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, घाम तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असतो. पण एक अडचण अशी आहे की, हे बायो मार्कर्स कशाप्रकारे मोजावे. कारण घामात यांचं प्रमाण खूप कमी असत.

थायरॉईड असंतुलन

जर तुम्हाला विनाकारण खूप जास्त घाम येत असेल, तर हायपरथायरॉयडिज्मचा संकेत असू शकतो. या स्थितीत मेटाबॉलिज्म फास्ट होतं, ज्यामुळे शरीर अधिक तापमान निर्माण करतं आणि घाम जास्त येऊ लागतो. जर यासोबत तुमचं वजन अचानक कमी झालं, घाबरल्यासारखं वाटत असेल, हार्ट रेट वाढले असतील तर वेळीच टेस्ट करावी.

डायबिटीस आणि ब्लड शुगरचं कनेक्शन

तुम्हाला थंडीच्या दिवसातही खूप जास्त घाम येत असेल तर हा ब्लड शुगर लेव्हल कमी झाल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा ब्लड शुगर लेव्हल कमी होते, तेव्हा शरीर अधिक घाम काढून संकेत देत असतं. जर तुम्हाला चक्कर येणे, कमजोरी आणि अचानक लागणे अशा समस्या होत असेल तर शुगरची टेस्ट करावी.

हॉर्मोन्समध्ये बदल

महिलांना मेनोपॉज किंवा प्रेग्नेन्सी दरम्यान हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं जास्त घाम येऊ शकतो. त्याचप्रमाणे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन असंतुलन झाल्यानंही अधिक घाम येतो. जर रात्री जास्त घाम येत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय गरमी वाटत असेल तर हा हार्मोनमध्ये असंतुलनाचा संकेत असू शकतो.

तणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रभाव

जर मानसिक तणाव, चिंता किंवा डिप्रेशनमध्ये असाल तर याचा प्रभाव घामाच्या ग्रंथींवर पडू शकतो. जास्त तणाव घेतल्यास नर्वस सिस्टीम अॅक्टिव होतं, ज्यामुळे हात-पाय आणि कपाळावर जास्त घाम येऊ लागतो. जर तुम्हाला घाम तणावात जास्त येत असेल तर हा संकेत आहे की, मानसित शांतता आणि रिलॅक्सेशनची गरज आहे.

इन्फेक्शन किंवा एखाद्या आजाराचा संकेत

जर तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल आणि त्यासोबत ताप, थंडी, थकवा किंवा शरीरात वेदना होत असेल तर हा एखाद्या बॅक्टेरिअल इन्फेक्शन किंवा वायरल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. ट्यूबरक्युलोसिस (टीबी), मलेरिया किंवा एखाद्या गंभीर आजाराही जास्त घाम येऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

12 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

18 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

18 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

19 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

19 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

19 तास ago