आरोग्य

बाळाला कफ झाला, रात्ररात्र खोकतोय, करुन पाहा ‘या’ पुरचुंडीचा उपाय, कफ होईल कमी

थंडी, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. लहान मुलांना काही ना काही कारणांनी सर्दी, खोकला, कफ होतच असतो. लहान मुलांसाठी वेगवेगळी औषधं मेडिकल मध्ये मिळतात. पण त्या चिमुकल्यांना अशी औषध द्यावी की नाही? त्यांना ती पचतील का? असे प्रश्न उगाच डोक्यात फिरत राहतात. अशा वेळी लागेचच आपण आई किंवा आजीकडे उपाय विचारायला जातो.

शिक्षित डॉक्टरांपेक्षा अनुभवी महिला अशा वेळी जास्त जवळच्या वाटतात. मग आई एक जादूची पोटली तयार करून देते. जिच्यामुळे लहान मुलांचा कफ सुटतो. सर्दी बरी होते आणि खोकला पण जातो. वर्षानुवर्षे चालत आलेला हा उपाय म्हणजे ओव्याची पुरचुंडी. बळांसाठी हा उपाय नेहमीच उपयुक्त ठरला आहे. आपल्या आईने, आजीने आपल्यासाठी ही ओव्याची पुरचुंडी वापरली असेलच. ‘जुनं ते सोनं’ असा हा उपाय आहे.

“घरगुती उपाय नको.” असं आजकाल बऱ्याच जणी म्हणतात. त्यांनी हे लक्षात घ्या की, डॉक्टरही हा उपाय सुचवतातच. करायला सोपा आणि दुष्परिणाम काहीच नाहीत. “ओव्यामध्ये अँटी- बॅक्टेरियल सत्व असतात.” त्यामुळे ओव्याच्या वासाने साकळलेला कफ विरघळून बाहेर पडतो. कंजेक्शन कमी कमी होत जाऊन नाहीसे होते. छातीचा पिंजरा साफ होतो. पोटासाठीही ओवा चांगला. बाळांना ओवा खायला देऊ शकत नाही. तो तिखट लागतो. अडकू शकतो. त्यामुळे ओव्याची पुरचुंडी वापरायची पद्धत आहे.

पुरचुंडी कशी तयार कराल

1) तव्यावर किंवा पॅनमध्ये अर्धी वाटी ओवा घ्या. त्याचा वास सुटेपर्यंत तो परतून घ्या. सुती कापडामध्ये तो बांधून त्याच्या पुरचुंड्या तयार करून घ्या. तीन चार पुड्या तरी तयार करा. जास्त फायदेशीर ठरेल.

2) पूरचूंडी सुटणार नाही याची काळजी घ्या. नीट घट्ट बांधा.

3) बाळाच्या आजूबाजूला त्या पुड्या व्यवस्थित पसरवून ठेवा.

4) ओव्याच्या वासाने बाळाचे नाक वाहायचे थांबते. हा उपाय नक्की करून पाहा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

10 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

16 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

16 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

17 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

17 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

17 तास ago