महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांच्या ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, काही ठिकाणी ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. या पैशांचा स्रोत, पैसे देणारे आणि घेणारे कोण, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, विधान परिषद निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया न राहता पैशांचा बाजार बनली आहे. “७० टक्के लोक विकले गेले,” असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काही नेत्यांनी नगरसेवकांना पैसे दिल्याच्या चर्चाही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, याबाबत कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत, वर्धा-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केले असतील तर त्यासंबंधीचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, देशात महागाईने कळस गाठला असून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. निर्यात क्षेत्रात घसरण, वाढती बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरतेमुळे तरुणांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. देशातील युवक आता आपले प्रश्न ठामपणे मांडत असून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचा दावा त्यांनी केला.

सीबीएसई परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, परीक्षांमधील कथित गैरकारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रोल करणे किंवा त्यांना देशद्रोही व पाकिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत दुर्दैवी आहे. युवाशक्तीच आगामी काळात परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी समाजाविषयी सरकारची भूमिका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मते मागायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करायचे, हे सरकारचे धोरण बनले आहे. राज्यातील ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि इतर मागास घटकांची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक व आर्थिक सवलती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

बार्टी, सारथी आणि इतर संस्थांना समान निधी देऊन समान विकास साध्य होऊ शकत नाही. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही; मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना अधिक शैक्षणिक सुविधा व सवलती दिल्या पाहिजेत, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

14 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

18 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

18 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

18 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

18 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

18 तास ago