आरोग्य

बीटचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित करता येईल का?

बीट हे पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध अशी कंदमूळ भाजी आहे. ज्याचे सेवन करणे मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहींनी बीटचे सेवन करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. विशेषतः त्यात व्हिटॅमिन सी मुलबक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे, बीटमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हिवाळ्यात तुम्हाला ते उबदार ठेवते. परंतु, ही कंदमूळ भाजी असल्याने त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ती पिष्टमय मानली जाते (प्रति १०० ग्रॅम वजनाच्या बीटमध्ये चार ग्रॅमपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स असतात). ही एक पिष्टमय भाजी आहे, जी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असल्यामुळे ती तुम्ही कमी प्रमाणात खाऊ शकता.

बीटमधील ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम म्हणजे ६० इतके आहे. एखादे अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखर रक्तप्रवाहात किती लवकर सोडते याचे मोजमाप म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. परंतु, बीटमध्ये तंतू असतात, जे केवळ वजन वाढवतात आणि बीटचे पचन होण्यास वेळ लागतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे उत्सर्जन कमी होते; परंतु भुकेची जाणीव कमी होते.

बीटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, लोह व बायोअॅक्टिव्ह संयुगे असतात. त्यात फायटोकेमिकल्स असतात, जी रक्तातील साखर आणि इ्न्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यात कॅरोटिनॉइड्स असतात, ज्यांचे शरीर व्हिटमॅन एमध्ये रूपांतर करते. बीट अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्याने, ते मधुमेहाची गुंतागुंत कमी करू शकते. तसेच मज्जातंतू आणि डोळ्यांचे नुकसान, मूत्रपिंडाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यां संबंधीच्या समस्या टाळण्यास मदत करते.

बीटचे सेवन कसे करावे

बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने, ते जास्त शिजवू नका. कारण- त्यामुळे पोषक घटकांची हानी होते. त्याऐवजी कच्चे बीट घ्या. रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या घेणे आणि प्रत्येक जेवणसह त्याचे सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago