आरोग्य

हिवाळ्यातील आरोग्यदायी आहार

हिवाळ्यात आपली पचनशक्ती सुधारलेली असते, त्यामुळे या ऋतूत खाल्लेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खालील आहार अत्यंत फायदेशीर ठरतो.

उष्णता देणारे पदार्थ

तीळ आणि गूळ: तीळ उष्ण असतात आणि गुळात लोह भरपूर असते. मकर संक्रांतीच्या काळात म्हणूनच तीळ-गुळाचे पदार्थ खाल्ले जातात.

बाजरी: बाजरीची भाकरी शरीराला ऊब देते. बाजरीत तंतूमय पदार्थ आणि खनिजे भरपूर असतात.

पालेभाज्या: पालक, मेथी, शेपू आणि मोहरीचा साग यांसारख्या भाज्यांची या दिवसांत रेलचेल असते. यात लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात.

कंदमुळे: गाजर, बीट, रताळी यांचा आहारात समावेश करावा. गाजराचा हलवा किंवा कांजिजी आरोग्यासाठी उत्तम असते.

डिंकाचे लाडू: साजूक तूप, डिंक, सुके खोबरे आणि सुका मेवा वापरून बनवलेले लाडू हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असतात.

खारीक आणि बदाम: रात्री भिजवलेले बदाम किंवा खारकेची पूड दुधात टाकून घेतल्यास शक्ती वाढते.

व्हिटॅमिन-C युक्त फळे: संत्री, मोसंबी, आवळा आणि पेरू यांसारखी फळे खावीत. यामुळे सर्दी खोकल्या पासून बचाव होतो.

सीताफळ आणि बोर: ही या ऋतूतील खास फळे आहेत. त्याचा वापर अवश्य करावा.

हळदीचे दूध: रात्री झोपताना गरम दुधात हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आलं आणि लसूण: जेवणात आलं, लसूण आणि मिरीचा वापर वाढवावा. यामुळे शरीरातील कफ कमी होण्यास मदत होते.

काही महत्त्वाच्या टिप्स

पुरेसे पाणी प्यावे: थंडीत तहान कमी लागते, पण शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोमट पाणी पित राहावे.

ताजे आणि गरम अन्न: नेहमी ताजे आणि गरम पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे.

अति तेलकट टाळावे: जरी भूक लागत असली, तरी अति तेलकट किंवा जंक फूड खाणे टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

44 मिनिटे ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago