आरोग्य

हिंगाचा काढा- पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करण्याचा रामबाण उपाय

खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. मग यावर औषधं-गोळ्या घेतल्या जातात. पण यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. म्हणून या समस्यांवर काही घरगुती उपाय करुनही तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे- हिंगाचा काढा. त्यामुळे पोटांच्या सर्व समस्यांवर तात्काळ आराम मिळतो.

घरात बनवलेला हिंगाचा काढा सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे पोटातील गॅस, अॅसिडिटी यापासून तात्काळ सुटका मिळेल.

साहित्य

ओवा- अर्धा चमचा, शतपुष्प- अर्धा चमचा, हिंग- पाव चमचा, काळं मीठ- चवीनुसार, सुंठ- एक तुकडा, ज्येष्ठमध- एक लहानसा तुकडा.

कृती

हा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी वरील सर्व साहित्य २५० मीली लीटर पाण्यात घालून उकळवा. ५ मिनिटे हे चांगल्या प्रकारे उकळवल्यानंतर ते गाळून घ्या. जेवल्यानंतर अर्धा तासानंतर काढा प्या. त्यामुळे पचनतंत्र सुरळीत होईल. लहान बाळाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास चमचाभर काढा बाळाला पाजा. ताबडतोब याचा परिणाम जाणवेल. याशिवाय बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी अधिक पाणी प्या. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा. फायबरयुक्त आहार घ्या. तसंच मिनरल्स आणि मॅग्नेशियमचे सेवन करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago