आरोग्य

कमळाचे महत्व व फायदे

जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये तसेच भारतामध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व या वनस्पतीला प्राप्त झाले ती वनस्पती म्हणजे कमळ होय. एखाद्या वनस्पतीला धार्मिक महत्त्व प्राप्त होते, त्यावेळी ला ती वनस्पती अतिशय अतुलनीय असते. त्याबरोबर त्याचे अनेक फायदे सुद्धा असतात.

कमळाचे शास्त्रीय नाव Nilumbo Nucifera आहे. कमळे आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल आहे तसेच vietnam देशाचे सुद्धा ते राष्ट्रीय फूल आहे.

कमळाला संस्कृत मध्ये पंकज म्हणतात याचा अर्थ चिखलात जन्मलेला असा होतो. कमळाला नवनिर्मितीचा संदेश देणारी वनस्पती म्हणतात. कमळाच्या ज्या काळया रंगाच्या बिया असतात त्यांना जिवंत लक्ष्मी म्हणतात.

कमळाला अमानुष चिरंजीवी म्हणतात. त्याचं कारण असं, सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचा एक कार्यकाल ठरलेला आहे, तसेच प्रत्येक वनस्पतीच्या बियाचा विशिष्ट कार्यकाल असतो त्या काळातच त्या बिया रुजतात.

काही जून बिया त्यांची उगवण क्षमता नष्ट होते.. पण कमळाच्या बाबतीत असं नाही. कमळाच्या बिया हजारो वर्ष जुन्या असल्या, तरी त्या रुजतात. त्याची उगवण क्षमता कधीही नष्ट होत नाही. म्हणून कमळाला अमानुष चिरंजीवी म्हणतात. याचा अर्थ असा की अमरत्व प्राप्त झाले आहे असं म्हणतात.

कमळाचे फूल जितकं दिसायला सुंदर, तेवढेच उपयोगी सुद्धा आहे. कमळ शीत सुगंधी दाह कमी करणार वर्ण सुधारवनार आहे. कमळाच्या कोवळ्या पानांना संवर्धिका म्हणतात. ब्लीडिंग पाइल्स, ब्लीडिंग डिसऑर्डर मध्ये त्याचा वापर केला जातो.

तसेच कमळाचे जे जमिनीत वाढणारे खोड आहे, त्याला कमळ काकडी म्हणतात त्याची भाजी करतात. त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत.

कमळाच्या बिया आपण जेथे पैसे ठेवतो, तिथे दागिने असतात, किंवा लक्ष्मीपूजन असेल, त्यावेळी त्याचं पुजण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे सोन तसेच पैशाची वृद्धी होते असे म्हणतात.

याव्यतिरिक्त काही कमळाचे फायदे पुढीलप्रमाणे

१) विटामिन सी कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस चा सगळ्यात मोठा स्त्रोत कमळाच्या बिया आणी त्याच्या कमळ काकडीमध्ये असते.

2) जसे गुलाबाचा फुलांच्या पाकळ्याचा गुलकंद करतात, तसेच कमळाच्या फुलांच्या पाकळ्याचा कमल कंद तयार करतात. त्याचे खूप औषधी महत्त्व आहे.

3) कमळाच्या कच्च्या बियांची भाजी करतात कच्च्या काजू गराप्रमाणे..

४) कमळापासून उत्तम प्रकारचा धागा मिळवला जातो. त्याला Lotus silk म्हणतात.

५) तसेच बागेची शोभा वाढवण्यासाठी कमळाच्या वेगवेगळ्या संकरित वरायटी वाढवून बागेची शोभा वाढवली जाते..

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago