आरोग्य

तुमच्या स्वयंपाक घरातील गूळ शुद्ध की भेसळयुक्त? या सोप्या ट्रिक्स करा फॉलो

गूळ हा प्रत्येक स्वयंपाकघरात महत्त्वाचा घटक मानला जातो. गुळामुळे कोणत्याही पदार्थाला गोडवा येतोच परंतु त्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मकरसंक्रांतीच्या तिळगुळाच्या लाडू पासून ते दिवाळीच्या लाडू पर्यंत अनेक पदार्थांमध्ये गोडव्यासाठी गुळाचा वापर केला जातो. परंतु मार्केटमध्ये मिळणारा गूळ अनेकवेळा भेसळयुक्त मानला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की खरा गूळ नेमकं निवडायचा कसा

गुळामधील भेसळीमुळे त्याच्यामधील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतो. मार्केटमधील भेसळयुक्त गुळाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पण भेसळयुक्त गुळाचे सेवन करत नाहीत ना? असा प्रश्न अनेकांच्या मानामध्ये निर्माण होतो. चला तर जाणून घेऊया भेसळयुक्त गूळ कसा शोधायचा?

गुळाची शुद्धता कशी ओळखावीत

1) शुद्ध गुळाचा रंग हलका तपकिरी किंवा सोनेरी पिवळा असतो. जर मार्केटमधील गुळाचा रंग खूप तेजस्वी आणि तुमच्या डोळ्यांना आकर्षित करणारा असेल तर त्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केल्याची शक्यता आहे. गुळाची चाचणी करण्यासाठी त्याचा एक छोटा तुकडा पाण्यामध्ये विरघळावा. जर त्या पाण्याचा रंग बदलला तर त्या गुळामध्ये रसायनिक रंगाचा वापर केला आहे. शुद्ध गुळ पाण्यात कोणत्याही प्रकारचे रंग सोडत नाही.

२) कधी कधी गुळाच्या ढेपेचं वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये खडूची पावडर किंवा वॉशिंग सोड्याचा वापर केला जातो. एक छोटा गुळाचा तुकडा पाण्यात मिसळा. पाण्याखाली जर पांढरे ठर निर्माण झाले तर तो गूळ भेसळयुक्त आहे.

३) गुळाचा पोत आणि त्याचा कडकपणा त्याची शुद्धता दर्शवते. शुद्ध गुळ हलका मऊ आणि सहज विरघळणारा असतो. जर गुळ तुमच्या हातावर सहज चिकटत असेल तर तो शुद्ध गूळ आहे. भेसयुक्त गुळ कडक असतो आणि त्यामध्ये साखर क्रिस्टल्स किंवा इतर कृत्रिम रसायने मिसळली जातात.

४) गूळ आकर्षित दिसण्यासाठी आणि जास्त दिवस चांगला टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये सल्फरचा वापर केला जातो. गुळामध्ये सल्फर आहे की नाही तपासण्यासाठी गुळाचा छोटा तुकडा पाण्यात विरघळून त्यामध्ये हायड्राक्लॉरिक ॲसिडचे काही थेंब टाका. जर पाण्यामध्ये फोम किंवा बबल्स तयार झाले तर त्यामध्ये सल्फर वापर केला आहे.

शुद्ध गुळाची चव गोड असते व त्याचा सुगंध मातीसारखा असतो. जर गुळाची चव जास्त गोड आणि केमिकल युक्त असेल तर त्याचे सेवन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गरम वातावरणामध्ये शुद्ध गूळ विरघळण्यास सुरुवात होते. भेसळयुक्त गूळ वितळल्यावर पाणी सोडू लागते. शुद्ध गूळ नेहमी गडद रंगाचा असतो. मार्केटमधील रसायनिक सोनेरी पिवळ्या गुळाचे सेवन करणं टाळा. भेसयुक्त गुळेचे सेवन केल्यास तुम्हाल फूड पॉईझनिंग होण्याची शक्यता असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

1 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

1 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

1 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

7 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल…

7 तास ago