आरोग्य

विविध व्याधींवर उपाय

पाय, दात, कंबर दुखण

बारीक-सारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.

१) पाय दुखणे: मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्च तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

२) कंबर दुखी: विशेषत महिलांची: रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.

३) उसण भरणे: कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा

४) बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक ): बर्‍याचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्‍याच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.

५) दात दुखणे: आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.

६) पोटदुखी: ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.

७) जुलाब: जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.

८) उलटी: उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.

९) अपचन: अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू, मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.

1०) शौचास खडा होणे: ही सवय बर्‍याच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो. १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago