उंबराचे फायदे…
उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अॅंटी-पायरेटीक, अॅंटी इन्फ्लामेटरी, अॅंटी-मायक्रोबियल, अॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते.
डायबिटीसचा देशी उपचार…
उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर करू शकतात. पण ठोस पुराव्यांसाठी यावर आणखी शोध होणं बाकी आहे.
लिव्हर डिसऑर्डर…
आयुर्वेदात उंबराला लिव्हरचा आजार ठीक करण्यासाठी वापरलं जातं. याच्या पानांच्या रसात लिव्हर डॅमेज कमी करण्याचे गुण असतात. लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
पाइल्सवर उपाय…
पाइल्समध्ये मलद्वारांच्या नसांमध्ये सूज येते. ही समस्या गंभीर झाली तर त्यातून रक्तही येऊ शकतं. पण उंबरातील अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण या आजाराला दूर करण्यास मदत करतात.
डायरिया…
अभ्यासकांनी डायरियाच्या समस्येत उंबरांची भूमिका जाणून घेण्यासाठी रिसर्च केला. त्यांनी मुद्दामहून आधी डायरियाची समस्या निर्माण केली आणि नंतर उंबराच्या पानांच्या रसाचा वापर केला. याचे परिणाम सकारात्मक आणि डायरियापासून आराम देणारे मिळाले.
फुप्फुसाची समस्या…
रेस्पिरेटरीमध्ये इन्फेक्शन झाल्यावर खोकला, श्वास भरून येणे, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे यांसारखी लक्षण दिसतात. ही लक्षणं मॅनेज करण्यात उंबरांची मदत मिळते. याच्या वापरासाठी एखाद्या आयुर्वेदिक एक्सपर्टची मदत घेऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…