महाराष्ट्र

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विविध विधानांवर जोरदार टीका केली.

देशातील गरिबी निर्मूलन झाल्याचा दावा करताना मोदी सरकारकडून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले जात असल्याचा विसर मुख्यमंत्री फडणवीसांना पडला आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला. गरिबी संपली असेल तर रेशनवरील हे लाभार्थी कोण आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला दावा धादांत खोटा असल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, स्वामीनाथन समितीची स्थापना काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात झाली होती. मात्र, केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारने आयोगाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. आजही कांदा, सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा यांसारख्या पिकांना शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी या काळातील कामगिरीची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. तसेच बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांबाबत सरकारने नेमकी काय कारवाई केली याची माहितीही जनतेसमोर मांडावी, असे ते म्हणाले.

खरीप हंगामासाठी सरकारने सर्व तयारी केल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर टीका करताना सपकाळ यांनी राज्यात बियाणे टंचाई, खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि शेती क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यातील वास्तव परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस वेशांतर करून जनतेत जात नाहीत, तर इतर पक्ष फोडण्यासाठी जातात, असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी राज्य सरकारला ‘आंधळे, बहिरे आणि मुके’ सरकार असे संबोधले.

काँग्रेस हा डुबता पक्ष असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानालाही सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस हा देशाचा डीएनए असून भाजपाला खरे आव्हान देणारा एकमेव पक्ष काँग्रेसच आहे, असे ते म्हणाले. २०१४ मध्ये काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपामध्ये आज मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून गेलेले नेते आहेत, असा दावा करत त्यांनी भाजपाला मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’ अशी उपमा दिली.या पत्रकार परिषदेला नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी आणि हनुमंत पवार उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

19 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago