महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व प्रवीण लहामगे (वय ९) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनेक दिवसापासून मोकाट फिरणा-या बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त न केल्याने चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रवरा रुग्णालयासमोर राहणारे प्रवीण लहामगे यांचा मुलगा अथर्व हा तिसरीमध्ये शिकत होता. अथर्व याच्यावर रविवारी संध्याकाळी बिबिट्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. मित्रासोबत खेळण्यासाठी गेलेला अथर्व घरी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गोसावी यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अथर्ववर हल्ला केला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अथर्वची शोधाशोध केल्यानंतर रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची परीसरात दहशत होती जर वेळीच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले असते तर अथर्वचा जीव वाचला असता असे ग्रामस्थांनी सांगितले.

शिरुर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागरिकांना दिवसा बिबट्याचे दर्शन…

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

8 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

12 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

12 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago