पुणे: जि प प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली जि. पुणे) शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत पुणे जिल्ह्यात डंका. दरवर्षी नवोदय विद्यालयात इ ६वी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी इ ५ वी तील लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. परंतु, मर्यादीत प्रवेश संख्या असल्यामुळे या परीक्षेत अतिशय उच्च गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. यावर्षी आमच्या जि प प्राथमिक शाळा डोमखेल या शाळेने पहिल्याच प्रयत्नात उच्चांकी यश मिळवले.
नवोदय प्रवेश प्रात्र परीक्षेमध्ये शाळेतील तेजस जयवर्धन बलखंडे हा इयत्ता ५ वी तील विद्यार्थी ९६.२५ % गुण मिळवून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. तसेच आणखी ३ विद्यार्थी प्रवेश प्रतिक्षा यादीत आहेत. जवाहर नवोदय येथे प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. अतिशय अवघड असणारी ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे एक मोठे आव्हाण सर्वच विद्यार्थ्यासमोर असते. परंतु डोमखेल शाळेत पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी अतिशय कठोर मेहनत घेऊन हे शिखर पार केले.
या यशामध्ये शाळेचे आधारस्तंभ, विद्यमान ग्रा पं सदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समुह प्रा लि कंपनीचे चेअरमन काकासाहेब रामराव सातव पाटील यांचे सदैव असणारे प्रोत्साहान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत अशोकराव सातव पाटील यांचे वर्षभर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असणारे सहकार्य कायमच प्रेरणादायी ठरले. यासाठी ५वी च्या वर्गाचे वर्गशिक्षक उमेश थोरात सर आणि वर्षा विलास थोरात मॅडम या दोन्ही शिक्षकांची सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० (वर्षभर) अपार मेहनत फळास आली.
इतर गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
२) शुभ्रा मुधोळकर -९६.२५%
३) सार्थक चोबे-९३.७५%
. ४) शिवम गोंड -९२.५० %
५) शौर्य हनवते -८७.५० %
६) सुजल तुपे -८७.५० %
७) अदित्य सातव -८६.२५ %
८) भावेश भरडे -८६.२५ %
९) स्मिता गायगोपाळ -८५ %
१०) स्वरांजली कांबळे -८६.२५
११) शंभूराज डफळ -८६.२५
१२) अदिती झाडे -८२.५०
१३) श्रावणी केंदे -८१.२५
१४) स्वरांजली डफळ -७७.५०
१५) आदित्य वाघमारे -७६.२५
१६) वेदिका दौंडकर .७५
१७) समर्थ सोळुंके -७३.७५
१८) प्रथमेश जोगदंड -७३.७५
खरोखर शाळेच्या इतिहासातील पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे अभूतपूर्व यश आहे. संपूर्ण हवेली तालुक्यातून गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे संपूर्ण यश मिळण्यामध्ये हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हेमंत कुमार खाडे, विस्तार अधिकारी शंकर मुंडे, केंद्रप्रमुख प्रज्ञा बांदल, मुख्याध्यापिका वनिता कालप यांचे वर्षभर झालेले मोलाचे मार्गदर्शन कामी आले.
जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!
डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…
Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…