पुणे: राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक पुन्हा एकदा उंचावला आहे. इयत्ता दुसरीतील कु. अनुष्का नाथराव तुडमे हिने १५० पैकी १४० गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. आरवी नारायण सातव हिने १५० पैकी १३८ गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे विद्यार्थिनींना वर्गशिक्षक तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब टेमगिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वर्षभर नियमित शालेय वेळेत तसेच अतिरिक्त तास घेऊन विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थिनींना हे यश मिळाले.
तसेच या यशामागे शाळेचे आधारस्तंभ काकासाहेब रामराव सातव पाटील (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत अशोकराव सातव पाटील, पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी शंकर मुंडे, केंद्रप्रमुख प्रज्ञा बांदल यांचे सततचे प्रोत्साहन लाभले.
यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कालप आणि सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्यही या यशामध्ये मोलाचे ठरले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलने शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.
पुणे जिल्ह्यात जि प प्राथमिक शाळा डोमखेल शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत डंका…
जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!
डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…
Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…