महाराष्ट्र

पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे.

१२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात

प्राथमिक व माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल. दरम्यान, कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळा सुटीत शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात राहून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. जेणेकरून पटसंख्या कमी होणार नाही, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढणार नाही, हा त्यामागील हेतू आहे.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सत्र परीक्षा उरकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती समजणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लक्ष देणे सोयीचे होणार आहे. परीक्षा संपल्यानंतर निकाल तयार करून १ मे रोजी तो प्रसिद्ध होईल. १ मे ते ११ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

9 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

9 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

9 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

24 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago