संभाजीनगर: प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर – कन्नड – चाळीसगाव या ९३ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या मार्गावर औट्रम घाटात तब्बल १७.५ कि.मी. लांबीचा स्वतंत्र रेल्वे बोगदा होणार आहे, जो देशातील सर्वात लांब ठरेल.
खा. डॉ. भागवत कराड यांनी सांगितले की, आधी रेल्वे व रस्ते वाहतुकीसाठी एकत्रित बोगद्याचा विचार होता, पण आता वेगळे बोगदे होणार आहेत.
धाराशिव – बीड – संभाजीनगर – चाळीसगाव रेल्वे कॉरिडॉर
या कॉरिडॉरमुळे उत्तर आणि दक्षिण भारताला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २.३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
संभाजीनगर – अंकाई (मनमाड) दुहेरीकरण वेगात
९८.२५ कि.मी. अंतराच्या दुहेरीकरणासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या अंकाई – करंजगावदरम्यानचे माती काम ४५% पूर्ण झाले असून पुलांचे काम झाल्यानंतर रेल्वे ट्रॅक टाकण्यात येईल. २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.
छ. संभाजीनगर – परभणी दुहेरीकरण
या १७७.२९ कि.मी. अंतरासाठी २,१७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल.
वेरुळ – घृष्णेश्वराला रेल्वे कनेक्टिव्हिटी
या नव्या मार्गामुळे वेरुळ- ज्योतीलिंग घृष्णेश्वर देखील रेल्वे नकाशावर येणार आहे, ज्यामुळे पर्यटनाला मोठा बूस्ट मिळेल.
संभाजीनगर – अहिल्यानगर रेल्वेमार्ग
प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर या ८५ कि. मी. अंतराच्या रेल्वेमार्गाचा ‘डीपीआर’ केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे.
हा रेल्वेमार्ग ‘सिंगल’ नव्हे, तर ‘डबल २ लाइन’चा करण्यात येणार आहे.
हा मार्ग विद्युतीकरणासह दुहेरी 3 लाइनचा होईल. यासाठी २ हजार २३५ कोटी रुपये खर्च येणार आहे.