महाराष्ट्र

गाजावाजा न करता अडीच वर्ष केलेलं काम जनता विसरणार नाही

ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांचे एकनाथ शिंदेंबाबत कौतुकोद्गार

ठाणे: अडीच वर्ष महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केले. हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेलं काम लोक विसरणार नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. हिंदुत्वाविषयी जागरुक असलेले शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत, असे महाजन म्हणाले. ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महाजन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

महाजन पुढे म्हणाले की, हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा असल्याने आज शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले जे घरात बसून राहिले, परीक्षेला बसले नाहीत पण पहिले आले, मात्र एकनाथ शिंदे याला अपवाद ठरले. ते परीक्षेला पण बसले आणि पहिले आले, अशा शब्दांत महाजन यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बरे झालेल्या रुग्णांनी शिंदे यांना आभार पत्रं पाठवली, त्या पत्रांच वजन १०० किलो आहे, असं दृश्य आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवलं नाही. मात्र याचा कुठेही शिंदे यांनी गाजावाजा केला नाही हा त्यांचा मोठेपणा आहे, असे महाजन म्हणाले. शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कौतुक केले आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे प्रमुख असूनही शिंदे स्वत:ला नेता समजतात हा त्यांचा मोठेपणा आहे. काल रात्री साडेबारा वाजता एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भेटतो हे महाराष्ट्रासाठी नवीन आहे. शिवसेना पक्ष प्रवेशासाठी मंगेश चिवटे यांचे महाजन यांनी यावेळी आभार मानले.

महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सन्मानजनक युती होईल.एक ते दोन दिवसांत अंतिम स्वरुप दिलं जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडवणीस यांचे आहेत. ते प्रत्येक महापालिकेचा आढावा घेत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना आणि भाजपा विचारांची युती आहे. केंद्रात एनडीए सरकार आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसेना करत आहेत. काहीजण स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी युती करत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसे युतीवर लगावला.

आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जातोय. यात महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्ष प्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल आणि ते शिवसेनेचे काम ते जनतेपुढे प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago