महाराष्ट्र

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची ११ व १२ ऑगस्ट रोजी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचे उद्घाटन, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नवनियुक्त कार्यकारिणीची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत.

दोन दिवसांच्या कार्यशाळेत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

१० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी कार्यशाळेसाठी निमंत्रीत पदाधिका-यांची नोंदणी होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा. सामुदायिक प्रार्थना होईल व सकाळी ९.३० वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ऑनलाईन संबोधनाने शिबिराचा शुभारंभ होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचा समारोप होईल.

दोन दिवसांच्या कार्यशाळेत विविध चर्चासत्रेही होणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख पवन खेरा, राष्ट्रीय प्रवक्त्या व सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत, इतिहासकार अशोक कुमार पांडेय, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, पत्रकार निरंजन टकले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यशाळेला संबोधित करणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago