राजकीय

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज (सोमवार) लागले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का बसला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगाव गावामधे आहे. त्या पारगावमधे वळसे पाटील यांच्या गटाचा सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्या आहेत. शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे या सरपंच बनल्या आहे.

राज्याचे सहकारमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्याच गावात धक्का दिला आहे. निरगुडसर गावात झालेल्या चुरशीच्या झालेल्या लढतीत शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे 135 मतांनी विजयी झाले आहे. पुणे जिल्हयात अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होत आहे. परंतु, आंबेगावात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. निरगुडसर गावात शिंदे गटाचे सरपंच रवी वळसे पाटील विजयी झाले. या ठिकाणी एकूण 13 पैकीं 3 सदस्य शिंदे गटाचे तर 10 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले. रवी वळसे यांना 1483 तर राष्ट्रवादीचे संतोष टाव्हारे यांना 1348 मते मिळाली.

दरम्यान, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून जिह्यातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र यावर्षी या निकालात बदल दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्येही वेगळेपणा जाणवत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर किंवा सत्ता संघर्षानंतर मोठा बदल दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेले पाहायला मिळाले. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शरद पवार यांचे मानस पूत्र म्हणून पाहिले जाते. सत्ता संघर्षानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र या निवडणुकीत वळसे पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे तर शरद पवार गटाने बाजी मारली आहे.

अमोल कोल्हे यांना धक्का…
जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयात मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून सरपंच पद हे ठाकरे गटाकडे गेले आहे.

शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतवरती अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. 13 जागांसह सरपंच पदावरदेखील अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिरुरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केवळ 3 जागांवर शरद पवार गटाला समाधान मानावे लागले आहे.

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेदवदारांची नावे पाहा…

शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

दिलीप वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच घेतला काढता पाय…

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

दिलीप वळसे पाटील यांच्या मक्तेदारीला मतदार संघातूनच आव्हान…

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

6 मि. ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago