राजकीय

आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर सेल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक नवनवीन उपक्रम राबवून मावळते प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ही संघटना वाढवली. आता डॉ. सुनील जगतापही त्याच जोमाने काम करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

डॉक्टर, वकील हे शिक्षित वर्ग लोकांचे मत परिवर्तन करु शकतात. मधल्या काळात आपल्या डॉक्टर सेलने अतिशय चांगली कामगिरी केली, महापूर असो की कोविड, डॉक्टर सेल सेवा करण्यात सर्वात पुढे होता. डॉक्टर सेलने मोफत शिबिरे घेऊन सामान्य लोकांना मदत केली असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

डॉक्टर सेलच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांना पटवून द्यावी. हे करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच तयार करायला हवा. जास्तीत जास्त डॉक्टर आपल्या संघटनेशी कसा जोडता येईल याची काळजी घ्यावी असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago