राजकीय

राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण कृषिमंत्री गायब; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही.

ओला दुष्काळ जाहिर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत नाहीत. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना कृषिमंत्री आणि घटनाबाह्य सरकार गायब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारमध्ये महिला सुरक्षित नसल्याचं गंभीर मत व्यक्त केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ११ नोव्हेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा केली.

आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यात हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचं प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त केली. सरकारविरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. कोणी काही बोललं की चौकश्या लावा, तुरुंगात टाका, तडीपार करा…हे सगळं चाललं आहे ते हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत; किंबहुना हुकूमशाही आलेलीच वाटत आहे.

सभेला परवानगी नाकारता, सुषमा अंधारेना परवानगी नाकारता, किशोरी पेडणेकर यांना छळता, ऋतुजा लटकेंना छळलं… महिलांचा छळ सुरु आहे. आज राजकीय लोकांना सतावत आहेत. उद्या पत्रकारांना देखील छळतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago