पाबळ (सुनिल जिते): गेली एक-दीड महिन्यापासून कान्हूर मेसाई (ता. शिरूर) परिसरात शेतात बिबट्याचा वावर आहे. यामुळे वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कान्हूर व मिडगुलवाडी गावाच्या शिवेच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. काही शेतकऱ्यांना बाजरी तसेच मक्याच्या शेतात शुक्रवारी(ता.०१) बिबट्या निदर्शनास आला आहे.रात्रीचा गाडीवर प्रवास करताना काहींना रस्त्यावर दिसल्यामुळे बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कान्हूर परिसरातील गारकोलवाडी, मिडगुलवाडी, फलकेवाडी, या ठिकाणावरून अनेक विध्यार्थी कान्हूर मेसाई येथे शिक्षणासाठी जात आहे अनेक जण सायकल किंवा पायी जात असल्याने मुलांना बिबट्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील नारिकांनी केली आहे.
परिसरातून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काल पुन्हा बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर रेस्क्यू टीम व कर्मचारी जाऊन पाहणी केली असून तपासणी केली जात आहे. बिबट्याला लपण्यासाठी याठिकाणी पुरेशा प्रमाणात जागा आहे. त्यामुळे त्याचा वावर नाकारता येत नाही.
नारायण राठोड- वनरक्षक अधिकारी, शिरूर
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…