आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

मुख्य बातम्या

निर्वी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु झाली असुन ऐन थंडीतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलला उमेदवार मिळत नसल्याने एकाच गावातले दोन उमेदवार उभे केले असल्याची टिका केली होती. याला प्रतिउत्तर देताना किसान क्रांतीचे दादा पाटील फराटे म्हणाले, आम्ही एकाच गावातले दोन उमेदवार दिले. परंतु सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलाला उमेदवारी का घेतली…? अशी टिका त्यांनी केली.

पुढ बोलताना दादा पाटील फराटे म्हणाले, घोडगंगा साखर कारखान्याचे अनेक पत्रे फुटले आहेत. पाऊसामुळे अनेक मशिन खराब झाल्या. यावर अशोक पवार का बोलत नाहीत…? त्यांच्या मालकीच्या खाजगी व्यंकटेश कारखान्याची साखर त्यांनी दिवाळीच्या आधी महिनाभर वाटली पण शेतकऱ्यांच्या मालकीच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मात्र त्यांनी ऐन दिवाळीत रांगेत उभ राहायला लावल. शेतकरी शेजाऱ्याचा बांध कोरायची हिंम्मत करत नाहीत. पण अशोक पवारांनी मात्र कारखान्याची पाच एकर जमीन लाटली असा आरोप फराटे यांनी केला.

गेले अडीच वर्ष शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना वाचावा म्हणुन आम्ही सगळेजण संघर्ष करत असुन आमचा संघर्ष वायाला जाऊ देऊ नका नाहीतर पुढच्या पाच वर्षात घोडगंगा साखर कारखान्याची यापेक्षा वाईट अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही असे कळकळीचे आवाहन दादा पाटील फराटे यांनी शेतकऱ्यांना केले.

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे