घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

मुख्य बातम्या

न्हावरे (तेजस फडके): ज्यांच्या कष्टातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या सुरु आहे. त्या कामगारांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली होती. परंतु एप्रिल २०१९ पासून आजपर्यंतचा फरक थकीत असुन कामगारांचे रिटेंशन सन २००९-१० पासून मिळाले नाही. कामगारांचा पी एफ जून २०२२ पासुन भरलेला नाही. विमा पॉलिसीचे हप्ते सात महिन्यांपासून थकीत आहेत. तसेच ज्या कामगारांच्या जीवावर आपण मोठे झालात त्या कामगारांची गेली अनेक वर्षांपासून थकीत असलेली देणी कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी अद्याप का दिली नाही…? याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी टीका घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी केली.

रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथे घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या आयोजित कोपरासभेत सुधीर फराटे हे बोलत होते. पुढे बोलताना फराटे म्हणाले, घोडगंगा कारखान्यातील 30 नोव्हेंबर 2017 पासून 11 कामगार मयत झाले आहेत. मयत कामगारांच्या वारसांना सर्व कामगारांच्या पगारातून कापलेला एक दिवसांचा पगार दिला जातो. त्याची थकबाकीची एकूण रक्कम 46 लाख 27 हजार एवढी आहे. 4 जुलै 2018 पासून 16 लोक सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांचे 40 लाख 29 हजार 427 रुपये देणे अद्यापही बाकी आहे. सन 2014 पासून 25 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांची 25 लाख 80 हजार इतकी रक्कम अद्याप बाकी आहे. एवढी मोठी रक्कम देणे बाकी असताना कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवारप्रचार सभेत मोठ्या बढाया मारत असून कामगारांचा घामाचा पैसा ते कधी देणार आहेत असा सवाल फराटे यांनी केला. तसेच हा कामगारांचा तळतळाट बरा नाही असा खोचक टोला ही फराटे यांनी लगावला.

यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, आबासाहेब गव्हाणे, महेश ढमढेरे, ऍड सुरेश पलांडे, सुवर्णा बिभीषण फराटे, मंदाकिनी नागवडे, तात्यासो घाडगे, राहुल गवारी, वीरेंद्र शेलार, सुभाष शेलार, शांताराम कांबळे, पांडुरंग सावित्रा थोरात, अशोक माशेरे, दत्तोबा शेंडगे, अशोक गारगोटे यांसह उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे