शिरूर तालुका

शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी निलेश चव्हाण यांची निवड

शिरुर (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या शिरुर तालुका सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी सरदवाडी (ता. शिरुर) येथील निलेश चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल कावळे यांच्या हस्ते चव्हाण यांना पत्र देण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे यांच्या उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या अध्यक्षतेखाली राधास्वामी क्लब हाऊस केसनंद (ता.हवेली) येथे हा कार्यक्रम पार पडला.

 

या निवडीनंतर बोलताना निलेश चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे सोशल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मिडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काॅगेस पक्षाची ध्येय व धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

51 मिनिटे ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

54 मिनिटे ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

1 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

4 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

5 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

5 तास ago