Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणाला सध्या काही वाळू माफियांची नजर लागली असुन गेल्या सहा महिन्यापासुन या धरणात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. परंतु शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले आहेत.

त्यातच आता घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या एका गावातील  विद्यमान सरपंच महसूल आणि पोलिस प्रशासनाला हाताशी धरुन स्वतःच वाळू चोरी करत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपुर्वी याच सरपंच महाशयांनी मुख्यमंत्री तसेच महसुलमंत्री यांना घोड धरणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याबाबत पत्रव्यवहार करत वाळू उपसा बंद पाडला होता.

त्यानंतर काही दिवसांनी याच महाशयांनी शिरुर तहसिलदार कार्यालयातील महसूल विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच शिरुर पोलिस स्टेशनच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेंच कर्मचाऱ्यांशी संगनमत करत स्वतःच घोड धरणात यांत्रिक बोटीच्या साह्याने वाळू उपसा सुरु केला आहे. त्यामुळे आता जर ‘कुंपणच शेत खायला लागलं तर तक्रार करायची कुणाकडे’ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

सहा महिन्यापुर्वी बीट अधिकाऱ्याची बदली…?

घोड धरण हे निमोणे-निर्वी बीटाच्या परिसरात येते. शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाळू माफियांच्या फायद्यासाठी या भागातील बीट अंमलदारांचे चांगले काम असतानाही काही दिवसांपुर्वी त्याची जाणीवपुर्वक बदली केली आणि त्याच्या जागी स्वतःच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्याची नेमणूक केली. तसेच नेमलेला मर्जीतला कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाखोंचा ‘वाळूचा महसूल’ गोळा करुन देत असल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा आहे.

महसूल विभागाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात…? 

आत्तापर्यंत महसूल विभागाने घोड धरणातील वाळू उपशावर तीन वेळा कारवाई करत जिलेटीनच्या साह्याने यांत्रिक बोटी उध्वस्त केल्या. परंतु त्यानंतर लगेचच आठ दिवसातच वाळू माफियांनी पुन्हा वाळू उपसा चालु केला. त्यामुळे महसूल विभागाने केलेल्या कारवाईवरचं संशय व्यक्त केला जात असुन हि कारवाई म्हणजे फक्त ‘मी मारल्यासारखं करतो, तु रडल्यासारखं कर’ या म्हणीप्रमाणे कारवाईचा फक्त दिखावा केला जातोय का…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

(क्रमशः) 

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात हम नहीं सुधरेंगे…?

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

वाळू तस्करांना दंड नाही तर थेट एफआयआर महसूल विभागाचे नवे परिपत्रक

घोड धरणात वाळूचोरी ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

घोड धरणातील अवैध वाळू उपशावर महसुल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

15 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

24 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago