शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात गेल्या दोन वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असुन महसूल आणि पोलिस विभाग जाणीवपुर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. यांत्रिक बोटीच्या साह्याने घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असल्याबाबत एका जागरुक युवकाने डायल ११२ ला कॉल केला. पण शिरुर पोलिस मात्र तब्बल तीन तासानंतर तत्परता दाखवत घटनास्थळी हजर झाले. या सर्व प्रकारामुळे घोड धरणातील वाळू माफियांना पोलिसच मदत तर करत नाही ना…? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.
शनिवार (दि १४) रात्री १०:३० च्या दरम्यान रोजी शिंदोडी येथे घोड धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असल्याचे एका स्थानिक युवकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने डायल ११२ ला कॉल करत सदरचा प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री ११ च्या दरम्यान शिरुर पोलिस स्टेशनचे न्हावरे येथे नेमणूकीस असलेले कर्मचारी यांचा त्या युवकाला फोन आला अन तुमचं लोकेशन पाठवा असं त्यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने त्या युवकाने त्यांना मोबाईल वरुन गुगल लोकेशन पाठवले. परंतु पोलिस मात्र तब्बल तीन तासांनी घटनास्थळी हजर झाले.
संबंधित युवक शनिवार (दि १४) रोजी रात्री ११ ते रविवार (दि १५) रोजी पहाटे २ वाजेपर्यंत पोलिसांच्या संपर्कात होता. परंतु शिरुर पोलिस मात्र फक्त अडचणी सांगत होते. अखेर तीन तासांनी पोलिस शिंदोडी येथे हजर झाले. मात्र तोपर्यंत घोड धरणात यांत्रिक बोटीच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा करणारे वाळू माफिया गायब झाले होते. त्यामुळे संतापलेल्या संबधित युवकाने पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. पण पोलिस मात्र आम्हाला सरकारी गाडी उपलब्ध नव्हती. आम्ही दुचाकीवर रात्रीच्या वेळेस कस येणार…? अशी वेगवेगळी कारण देत राहिले.
मुजोर वाळू माफियां प्रशासनाला सुद्धा घाबरेनात…?
गेल्या दोन वर्षांपासुन घोड धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु आहे. याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने निर्भीडपणे आवाज उठवला आहे. परंतु स्थानिक पातळी ते वरपर्यंत महसूल आणि पोलिस यंत्रनेत काही भ्रष्टाचार करणारे कर्मचारी आणि अधिकारी असल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले असुन सरकारी अधिकाऱ्यांना चांगला ‘मलिदा’ मिळत असल्याने महसूल तसेच पोलिस खात्यातील अधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ‘आमचं कोणीच काही वाकड करु शकत नाही’ असा वाळू माफियांमध्ये फाजील आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
(क्रमशः)
शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड
व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त
घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?
घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच वरातीमागुन घोड; शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल