संभाजीनगर: ज्या नागरिकांनी गुंठेवारी भूखंड खरेदी केले आहेत किंवा अशा भूखंडांवर बांधकाम केले आहे, त्यांनी आपल्या मिळकतीचे गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण करून घ्यावे. अन्यथा अशा मिळकती अनधिकृत मानून महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. म्हणून सर्वांनी वेळेत नियमितीकरण करून घेण्याचे आवाहन छ. संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे.
गुंठेवारी म्हणजे काय?
गुठेवारी ही अशी जमीन असते जी सरकारी नियोजनाविना म्हणजेच “Lay-out” शिवाय खाजगीरित्या वाटप करून विकली गेलेली असते. यामध्ये मालमत्ता असूनही ती कायदेशीर कागदपत्रांशिवाय “अनधिकृत” ठरते.
गुंठेवारी नियमित केल्याचे फायदे
1) तुमचा भूखंड/बांधकाम कायदेशीर व संरक्षित होतं
2) नोटरी किंवा खरेदीखताद्वारे मालमत्ता विक्री करता येते
3) बँकेतून कर्ज घेण्यासाठी पात्रता
4) मालमत्तेवर दंड / शास्ती टळते
5) विकास आकार शुल्कात ३०% ते २५% पर्यंत सवलत
6) वारसांना मालमत्तेचा हक्क कायदेशीररित्या देता येतो
7) भविष्यातील बांधकामांना पालिकेची परवानगी घेणे शक्य होते.
आवश्यक कागदपत्रे
मालकी हक्काचे कागद (सातबारा, खरेदीखत, बाँड पेपर)
स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (इमारतीसाठी)
मान्यताप्राप्त आर्किटेक्टने तयार केलेला विद्यमान गुठेवारी नकाशा
जागेचा मोजणी नकाशा
मालकाकडून लेखी परवानगी (अनुमतीपत्र)
पालिकेची देयक भरणा पावती / करप्रमाणपत्र
लक्षात घ्या…
ज्यांनी ३१ डिसेंबर २०२० पूर्वी भूखंड विकत घेतले आहेत, त्यांना ही योजना लागू आहे.
गुंठेवारी नियमित न केल्यास मालमत्ता ‘अनधिकृत’ मानली जाईल आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते.
योजना कालमर्यादित असून, त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.
सर्व प्रक्रिया कायदेशीर असून पालिकेच्या मार्गदर्शनात पार पडेल.
🗣️ अधिक माहितीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नगर नियोजन विभाग किंवा तुमच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधा.