शिरूर तालुका

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

वाचन प्रेरणा दिना निमित्ताने संभाजीराजे विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन!
शिक्रापूर : ‘ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य वाचनात आहे. मानवी जीवनात चरित्रातून चारित्र्य संवर्धन करणेचा महामार्ग म्हणजे दैनंदिन वाचन होय. विद्यार्थी दशेपासून जीवनाच्या रोजच्या वाटचालीत प्रसन्नता, प्रगल्भता, आदर्शवाद व सुस्थिरता या मूल्यांसाठी प्रत्येकाने दैनंदिन १५ मि. वेळ वाचनासाठी द्यावा, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.

जातेगांव बु (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने पुस्तक, पोस्टर्स, ग्रंथ प्रदर्शन, वाचन उपक्रम, वाचन प्रेरणा दिन शपथ, मराठी राजभाषा संवर्धन, वाचन कट्टा आदि उपक्रमांचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी दररोज १५ मि वाचन करणेची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्ताने साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाबाबत विद्यालयीन विद्यार्थ्याना त्यांच्या जीवनकार्याचा जीवनपट सांगण्यात आला. डॉ. कलाम यांच्या जीवनातील तंत्र – विज्ञानातील प्रगती, वैज्ञानिक कामगिरी, अध्यात्मिक विचारधारा इ बाबतचे पैलू उलगडण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य रामदास थिटे, प्राचार्य डॉ. विजय गायकवाड, सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक गणेश बांगर, सुनिता उमाप, संगिता ढवळे, विजय वरपे, प्रिती पवार, रमेश जाधव, शंकर भुजबळ, कांतीलाल धुमाळ, प्रिया उमाप आदि मान्यवर सहभागी झाले होते.

प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…

योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

प्राचार्य रामदास थिटे यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार!

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे

भावी पीढीसाठी शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

18 मिनिटे ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

33 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

37 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

47 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

52 मिनिटे ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

55 मिनिटे ago