शिरूर तालुका

Video: रांजणगाव गणपती-हिवरे-पाबळ-राजगुरूनगर रस्ता दुरुस्तीची मागणी…

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) : रांजणगाव गणपती- हिवरे-पाबळ-राजगुरूनगर हा प्रमुख मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

संबंधित मार्गावरुन दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी जाणारे कर्मचारी, शेतकरी, व्यापारी तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. मात्र या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता अपघातांचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

त्या रस्ताची चाळण; १७ शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामस्थांचा महामार्ग रोखण्याचा इशारा

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

करडे–कारेगाव रस्ता झाला खड्ड्यांचा मार्ग; एक-दोन नव्हे तर तब्बल ३०० खड्डे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

3 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

7 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

7 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago