(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. पण, ठेकेदाराच्या नियोजनच्या अभावामुळे रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्त्यावर दिवसेंदिवस अपघात होताना दिसत आहेत. परंतु, ठेकेदाराला कशाचे काही पडले नाही. संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते आणि वाघाळे गावच्या विकास सोसायटीचे संचालक अशोक सोनवणे यांनी दिली.
शिक्रापूर-मलठण रस्त्यावरून बुरुंजवाडी, गणेगाव, वाघाळे, मलठण या गावांसह अनेकांना रात्री-अपरात्री ये-जा करावी लागत आहे. रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करत काम सुरू ठेवले आहे. यामुळे दिवसागणीक अनेक अपघात घडत आहेत. कोणाला शारिरीक इजा होत आहे तर कोणाच्या वाहनांचे नुकसान होत आहे. वाहनचालक अपघातानंतर गपगुमाने सहन करत जात आहेत. याबाबत कोणीही तक्रार करत नसल्याचा फायदा ठेकेदाराने घेतला असून, मनमानी प्रमाणे रस्त्याचे काम सुरू ठेवले आहे.
View this post on Instagram
शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू करताना कोणतेही सुरक्षिततेचे नियम पाळलेले दिसत नाहीत. संबंधित रस्ता मोठा वर्दळीचा असून, कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला नाही. रस्त्यात मोठ-मोठे खड्डे, मातीचे ढिगारे ठेवले आहेत. वाहन चालकांना रात्री-अपरात्री ये-जा करावी लागत असताना अनेक वाहने घसरून पडत आहेत. शिवाय, रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कोठेही रस्त्याचे काम सुरू असल्याचा अथवा कोठपर्यंत खोदल्याचा उल्लेख नसल्यामुळे नवीन वाहनचालकांना प्रवासादरम्यान मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असे अशोक सोनवणे यांनी सांगितले.
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा! https://t.co/8O7NaTuFX4 @Dev_Fadnavis @mieknathshinde @nitin_gadkari @Dwalsepatil @kolhe_amol @CMOMaharashtra @puneruralpolice @PawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks @SantoshDhaybar
— shirur (@shirurtaluka) March 21, 2026
Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…
शिक्रापूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा